‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ

‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ

 


सातारा : वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली असून सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार बुधवारी सात मतदारसंघासाठी ५८ इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. तर वंचितचा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवारही माणमधून जाहीर झाला आहे. पक्षाने इम्तीयाज नदाफ यांना उमेदवारी दिली आहे.