
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; दिवाळीपूर्वीच सोन्याला पुन्हा झळाळी
शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०२४
Edit
आज सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. दिवाळीपूर्वीच आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ७६२ रुपयांनी वाढून ७५६०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. सराफा बाजारात चांदीचा भाव १५६४ रुपयांनी वाढून ८९९१७ रुपये प्रति किलो झाला आहे.
सोन्या-चांदीचे हे दर आयबीजेएने जाहीर केले आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेसचा समावेश नाही. आपल्या शहरातील सोने-चांदीच्या दरात १००० ते २००० चा फरक असण्याची शक्यता आहे.