
मायक्रोसॉफ्टच्या सत्य नाडेला यांच्यानंतर टेस्ला व ट्विटर प्रमुख इलॉन मस्क यांनी घेतली बारामतीच्या या प्रकल्पाची दखल
कृत्रीम बुध्दीमत्तेचा वापर करुन कमी खर्चात अधिक शेती शक्य आहे ही बाब बारामतीतील अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने मायक्रोसॉफ्ट या जगप्रसिध्द कंपनीच्या मदतीने सिध्द करुन दाखविली आहे. मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्य नडेला यांनी नुकतीच दिल्ली येथे या प्रकल्पाची दखल घेत भविष्यात हा प्रकल्प भारतातील छोट्या शेतक-यांसाठी वरदान ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांनी स्वताः या बाबतची माहिती सोशल मिडीयाच्या माध्यमातून जगभऱात पोहोचवली होती. त्यांच्याच माहितीची दखल इलॉन मस्क यांनी घेतली आहे.
प्रकल्पाचे महत्व समजू लागले...
इलॉन मस्क यांनी बारामतीतील या प्रकल्पाची दखल घेणे ही बाब या प्रकल्पाचे मोठे यश आहे. कृत्रीम बुध्दीमत्तेचा प्रभावी वापर कृषी क्षेत्रात झाला तर त्याचे सकारात्मक परिणाम जगभरातील कृषी क्षेत्रावर होतील, याची कल्पना इलॉन मस्क यांना असल्याने त्यांनी या प्रकल्पाची आपणहून दखल घेतली आहे. या प्रकल्पाला जागतिक मान्यताही मिळू लागली आहे, हे याचे यश आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सातत्याने प्रशिक्षण व संशोधनासाठी प्रोत्साहन दिल्याने हे शक्य झाले. प्रकल्पाचे महत्व हळुहळू सर्वांना समजू लागले.
- प्रतापराव पवार, विश्वस्त, अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट.