भारत फोर्जच्या कर्मचाऱ्यांकडून बारामतीत उच्चांकी रक्तदान

भारत फोर्जच्या कर्मचाऱ्यांकडून बारामतीत उच्चांकी रक्तदान

 


बारामती :- येथील भारत फोर्ज येथे नुकतेच रक्तदान शिबि राचे आयोजन केले होते.याप्रसंगी बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या पोलिस निरिक्षक वैशाली पाटील,कंपनीचे सदाशिव पाटील,अजितकुमार जैन,दिनेश दौंडकर,कामगार संघटनेचे अध्यक्ष किरण खोमणे, सचिव रणजित भोसले व  पदाधिकारी उपस्थित होते.

गेल्या बारा वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येतो अशी माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली.या शिबिरात तब्बल ५८० पिशव्यांचे संकलन करण्यात आले.आजपर्यंत झालेल्या सर्व रक्तदान शिबिरातील रक्तसंकलन पिशव्यांचा हा उच्चांक असल्याचे सदाशिव पाटील यांनी नमूद केले.