
माळेगाव कारखाना निवडणूक बिगुल वाजले! सभासदांची अंतिम मतदारयादी प्रसिद्ध; एकूण ६ गटांतून (अवर्ग) १९ हजार ५४९; 'ब' वर्गातून १०२ जण बजावणार मतदानाचा हक्क
बारामती :- तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५ ते २०३० या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने कारखाना सभासद मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. एकूण ६ गटांतून ('अ' वर्ग) १९ हजार ५४९, तर 'ब' वर्गातून १०२ सभासद आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
माळेगाव साखर कारखाना कार्यक्षेत्रातील गट, गटातील गावे व मतदार पुढीलप्रमाणे :
गट क्रमांक १ : माळेगाव (२९६५) - गावे माळेगाव : बुद्रुक (१७६७), माळेगाव खुर्द (५८०), येळेगाव (१९४), पाहुणेवाडी (१४०), ढाकाळे (२८४). गट क्रमांक २ : पणदरे (३७९६) - गावे : पणदरे (२२८६), मानाप्पाचीवाडी (२७८), पवईमाळ (२१५), सोनकसवाडी (३५१), कुरणेवाडी (१४९), धुमाळवाडी (२८८), खामगळवाडी (२२९). गट क्रमांक ३ : सांगवी (२४८७) - गावे : सांगवी (१३३६), कांबळेश्वर (७००),शिरष्णे (२८२), पांढरेवाडी (११९), पिंगळेवाडी (५०). गट क्रमांक ४ : खांडज - शिरवली (२३७९) - गावे : खांडज (१४७७), शिरवली (९०२). गट क्रमांक ५ : निरावागज (३५०६) - गावे : निरावागज (१८५३), मेखळी (१२७३), सोनगाव (२४१), घाडगेवाडी (१३९). गट क्रमांक ६ : बारामती (४४१६) - गावे : बारामती (७०३), मळद (६९१), मेडद (६०५), गुणवडी (४४७), डोरलेवाडी (२३३), राजाळे-सांगवी (१), वीरपुरी- दहिगाव (१), कऱ्हावागज (५६१), नेपतवळण (२८८), बऱ्हाणपूर (१२०), उंडवडी सुपे (१८२), उंडवडी क. प. (१४७), जराडवाडी (२८६), सोनवडी (१५१).