उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते विविध शासकीय संस्थांकरिता पाणी टाक्यांचे वितरण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते विविध शासकीय संस्थांकरिता पाणी टाक्यांचे वितरण

 

बारामती:- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्हा पालक मंत्री अजित पवार यांच्या हस्ते तालुक्यातील विविध शासकीय संस्थांकरिता उद्योजकांच्या वतीने देण्यात आलेल्या पिण्याचे पाणी साठवणुकीस १ हजार लिटर क्षमतेच्या ६० टाक्या वितरित करण्यात आल्या.

     पंचायत समिती परिसरात आयोजित कार्यक्रमाच्या वेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) बारामती प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील,गट विकास अधिकारी डॉ.अनिल बागल,गटशिक्षण अधिकारी निलेश गवळी,बारा मती बँकेचे अध्यक्ष सचिनसातव, बारामती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुशीलकुमार सोमाणी, उद्योजक आदी उपस्थित होते.

     श्री.पवार म्हणाले सर्वसामान्य नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या साठी महाराष्ट्र औद्योगिकविकास महामंडळ प्रादेशिक कार्यालयाचे वतीने बारामती तालुक्यातील ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या अंगणवाडी,आरोग्य उपकेंद्रे, प्राथ मिक शाळा आणि पशुसंवर्धन दवाखान्यांना १ हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या साठवण टाक्यांचे वाटप करण्यात आले. यामुळे अंगणवाडीतील बालक, विद्यार्थी,कर्मचारी तसेच नागरि कांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा मिळणार आहे. 

       आगामी मान्सून काळात स्थानिक पातळीवर स्वच्छता, पाणी,आजारांवर त्वरित उपचार, आवश्यकतेनुसार कीटकनाशकां ची फवारणी आदी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना ग्रामपंचायतींनी कराव्यात, अशा सूचना श्री.पवार यांनी केल्या.

     यावेळी श्री.पवार यांच्या हस्ते शरद सूर्यवंशी,खंडु गायकवाड, सुरेश परकाळे,दिलीप भापकर, प्रशांत जगताप व शंकर साळुंखे या उद्योजकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.

    🔷 एमआयडीसी प्रादेशिक कार्यालय आणि पंचायत समितीचा संयुक्त प्रयत्न

      🔹उद्योजकांचा सकारात्मक प्रतिसाद

      बारामती पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र,प्राथमिक शाळा, पशुसंवर्धन दवाखाने शासकीय संस्थांना पिण्याचे पाणी साठवणू कीकरिता टाक्या मिळण्याबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महा मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयास  मागणी करण्यात आली होती.या अनुषंगाने प्रादेशिक कार्यालया अंतर्गत येणाऱ्या उद्योजकांना पाण्याच्या टाक्या उपलब्ध करुन देण्याबाबत कार्यालयाने आवाहन केले असतां त्यास उद्योजकांनी सकारात्मक प्रतिसाद देत सुरुवातीला ६० टाक्या उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.