खाजगी सावकारांकडे जावे लागणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शिखर बॅंक थेट सहकारी सेवा सोसायटी यांना कर्ज देणार

खाजगी सावकारांकडे जावे लागणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शिखर बॅंक थेट सहकारी सेवा सोसायटी यांना कर्ज देणार

 


बारामती:- राज्यातील ३१ पैकी तब्बल २० जिल्हा सहकारी बँका अडचणीत आहेत. अशा ठिकाणी संबंधित जिल्ह्यामध्ये विकास सोसायटी यांना शेतकऱ्यांना कर्ज वाटप करताना मोठ्या अडचणी येत आहेत आणि काही ठिकाणी कर्ज वाटपही बंद पडले आहे. यावर तोडगा म्हणून राज्य सहकारी बँक म्हणजे शिखर बॅंक आता थेट सहकारी सेवा सोसायटी यांना कर्ज देणार आहे.

यामुळे राज्यातील तब्बल 20 जिल्ह्यांमध्ये कदाचित जिल्हा सहकारी बँकांची जी साखळी होती, ती सहकाराची एक साखळी तुटू शकते. पण थेट शिखर बँकेकडून गाव पातळीवरच्या विकास सोसायटीला कर्ज मिळू शकते. त्यामुळे ज्या भागांमध्ये विकास सोसायटी या सक्षम नाहीत, अथवा जिल्हा सहकारी बँका सक्षम नाहीत, अशा ठिकाणी खाजगी सावकारांकडे जावे लागणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.

राज्यातील सध्याच्या 27 हजार सहकारी सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 25 ते 30 हजार कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा केला जातो. मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हा सहकारी बँका सुक्षम राहिलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असलेल्या विकास सोसायट्या देखील अडचणीत सापडलेल्या आहेत, अशा विकास सोसायट्यांना राज्य सहकारी बँकेचा हातभार थेट मिळणार आहे.