रविवार २७ रोजी बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे वाढदिवसानिमित्त मोफत कॅन्सर तपासणी मोफत उपचार

रविवार २७ रोजी बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे वाढदिवसानिमित्त मोफत कॅन्सर तपासणी मोफत उपचार

 


बारामती :- महाराष्ट्राचे  उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री ना.अजित पवार यांचे वाढदिवसा निमित्त पणदरे ग्राम विकास मंच व बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघयांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, बारामती तालुका व परिसरातील सर्व नागरिकसाठी कॅन्सर मुक्त अभियान राबविण्यात येत आहे.  

       या अभियानांतर्गत बारामती तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना मोफत कॅन्सर तपासणी व मोफत उपचार उपलब्ध करण्यात येत आहेत त्या अनुषंगाने अहिल्या नगर(अहमद नगर) येथील,योगेश रूरल कॅन्सर अँड रिलिफ सोसायटीचे सुप्रसिद्ध डॉ.प्रकाश गरुड हे टाटा कॅन्सर हॉस्पिटल, मुंबई प्रशिक्षित तज्ञ कॅन्सर सर्जन व या क्षेत्रातील त्यांचा ४०वर्षांचा प्रदिर्घ अनुभव आहे.तसेच त्यांचे सोबत एम्स ( AIIMS ) चे प्रसिध्द डॉक्टर योगेश गरुड कॅन्सर सर्जन हे देखील असणार आहेत. 

       डाॅ.योगेश गरूड यांच्या सारखे तज्ञ डॉक्टर सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाचा व तपासणीचा फायदा होणार आहे तरी सर्व बारामती व परिसरातील नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. तसेच आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी योग्य संधीचा अवश्य लाभ घ्यावा. 

स्थळ : बारामती दुध संघ हॉल कारभारी चौक,बारामती, दिनाक २७/०७/२०२५. 

 वेळ सकाळी ११ वाजता

○● कॅन्सरची लक्षणे ●○

१) शरीरात कोठेही न दुखणारी गाठ असे रुग्ण. 

२) स्त्रियांच्या स्तनाच्या गाठी होणे 

३) लघवी व  शौचावाटे रक्त पडणे. 

४) स्त्रियांच्या अंगावरून पांढरे जाणे. 

५) थुंकीवाटे रक्त येणे, तोंडातील व्रण बरा न होणे. 

६) अन्न गिळतांना छातीत अडकणे किंवा उलट्या होणे. 

७) आवाजात बदल होणे,किंवा आवाज बसणे. 

८) संडास-शौचाच्या सवयीत आकस्मिक बदल होणे. 

९) स्त्रियांमध्ये अनियमित व वरचेवर योनी रक्तस्त्राव, विशेषत: पाळी थांबल्यावर. 

१०) शरीरावर पुर्वी असलेला तीळ व चामखीळ यांचा आकार वाढणे. 
११) तोंडातील वाढत जाणारी आणि दुखणारी गाठ.किंवा वाढणारे चट्टे,अल्सर वा तत्सम लक्षणे. 
१२) भूक मंदावणे व वजन घटणे इत्यादी ...समस्या असल्यास वेळीच उपचार करून घेणे फायदेशीर ठरते. 
     
त्याकरिता आपण रविवार दि. २७ जुलै २०२५. रोजी सकाळी ११ वाजता होणाऱ्या आरोग्य तपासणी साठी बारामतीतील दुध संघाचे हाॅल मध्ये कॅन्सर मोफत वैद्यकीय तपासणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
        
अमुल्य अशी सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे तरी याचा सर्वांनी फायदा करून घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. 
आयोजक ::
१)मोहन ढेरे  संस्थापक पणदरे ग्राम विकास मंच, 
२) संजय कोकरे चेअरमन दूध संघ बारामती 
३) डॉ.विक्रम जगताप
४) संजय पवार 
५) रविंद्र चव्हाण
६) डॉ. प्रदीप खलाटे 
७) डॉ. गोविंद कोकरे 
 ८) संतोष ढेरे 
९) अरविंद जगताप 
१०) राजेंद्र कोकरे 
११) संजय जगताप 
 व सर्व ग्रामस्थ पणदरे