कन्हेरीचे निसर्ग पर्यटनस्थळ, वनउद्यान नागरिकांना खुले होणार

कन्हेरीचे निसर्ग पर्यटनस्थळ, वनउद्यान नागरिकांना खुले होणार

 

विकासकामांची खासदार सुनेत्रा पवार यांनी केली पाहणी

बारामती  :- तालुक्यातील कन्हेरी येथील निसर्ग पर्यटन स्थळ व वनउद्यानाच्या विकास कामांची खासदार सुनेत्रा पवार यांनी नुकतीच पाहणी केली असून या वेळी त्यांनी वनउद्यान नागरिकांसाठी तातडीने खुले करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

       उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून कन्हेरी येथे निसर्ग पर्यटनास चालना देण्या साठी ५५ हेक्टर क्षेत्रावर वन उद्यान साकारण्यात येत आहे. सध्या जवळपास ९५ टक्के कामे पूर्ण झाली असून, उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करून उद्यान नागरिकांसाठी खुले करावे,असे निर्देश खा.सुनेत्रा पवार यांनी या वेळी दिले.त्यांनी शिवसृष्टी परिसर,पाणी साठवण तलाव,नर्सरी,तसेच झुलता पूल, झिप लाईन,बोटिंग,रॉकेट इजेक्टर,३६० डिग्री सायकल, मेल्ट डाऊन यांसारख्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी सुविधांची

 पाहाणी केली.कामांची गुणवत्ता, टिकाऊपणा आणि वेळेचे नियो जन योग्य असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

         कन्हेरी परिसरातील वन्य जीवन वनस्पती, जैवविविधतेचे संवर्धन व पर्यटनवाढ या दृष्टीने हे वनउद्यान उपयुक्त ठरणार आहे. यामुळे परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास खासदार पवार यांनीव्यक्त केला.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त उद्यान नागरिकांना खुले करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे वन विभागाकडून या वेळी सांगण्यात आले.

    यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे,वनपाल एस.आर. उंडे,वनरक्षक बी.व्ही.गोलाडे यांच्यासह ग्रामस्थ आदी उपस्थित होते.