अडचणीत असूनही छत्रपती कारखान्याच्या नवीन करारानुसार कामगारांना दहा टक्के वेतन वाढीस तत्वतः मान्यता

अडचणीत असूनही छत्रपती कारखान्याच्या नवीन करारानुसार कामगारांना दहा टक्के वेतन वाढीस तत्वतः मान्यता

 

पुणे:- पुणे जिल्ह्यातील भवानीनगरचा छत्रपती कारखाना अडचणीत असला तरी कारखान्याला अडचणीतून बाहेर काढेपर्यंत शेवटचा श्वास घेणार नाही हे वाक्य निवडणुकीच्या प्रचारात पदोपदी अंत:करणातून सांगणाऱ्या पृथ्वीराज जाचक यांनी पदभार स्वीकारल्यापासून संचालक मंडळाच्या सहकार्याने आपला विश्वासाचा शब्द आणि कामाची घोडदौड कायम ठेवली आहे. पृथ्वीराज जाचक यांच्या अष्टावधानी कार्यकर्तृत्वाला उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रत्येक वेळी असलेली तत्परता छत्रपती अडचणीतून बाहेर येणारच या विश्वासाला हातभार लावत आहे. 

त्यामुळेच राज्यातील साखर कामगारांना दहा टक्के सरासरी वेतन वाढ देण्याचा निर्णय राज्य पातळीवर घेण्यात आल्यानंतर त्याची पहिली अंमलबजावणी अर्थातच श्री छत्रपति सहकारी साखर कारखान्यामध्ये करण्यात आली आहे. संचालक मंडळाने याचा एकमुखी निर्णय घेतल्यानंतर साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे उपाध्यक्ष युवराज रणवरे यांनी कामगारांच्या वतीने कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे व संचालकांना पेढे भरवत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सैन्य प्रत्येक वेळी उपदेशावर चालत नाही, त्याला देखील पोट असते. त्या पोटाचा विचार जो करेल, तेथे सर्वव्यापी समृद्धता असते. पृथ्वीराज जाचक यांनी पहिल्या दिवसापासून हाच मंत्र प्रत्यक्ष कृतीत आणत कामगार आणि सभासद ही या कारखान्याची रथाची दोन चाके आहेत आणि दोघांनाही समान न्याय मिळेल हेच दाखवून दिले आहे.

दरम्यान कामगारांना १० टक्के वेतनवाढ देण्याला तत्वतः मान्यता देण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी दिली. राज्यातील साखर कारखान्यांमधील कामगारांच्या मागण्यांबाबत महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या त्रिपक्षीय समितीच्या करारानुसार २३ जुलै २०२५ रोजी झालेल्या बैठकीत १ एप्रिल २०२४ पासून सर्व अधिकारी व कामगार यांचे मुळ पगार, महागाई भत्ता व स्थिर भत्ता मिळून मिळणाऱ्या एकुण पगारावर १० टक्के पगारवाढ व सोयी-सुविधा देण्याचे मान्य करून करार केला आहे.

सभासदांबरोबरच कामगारांच्या हिताला प्राधान्य, त्रिपक्षीय समितीच्या करारानुसार कामगारांना सर्वपथम वेतनवाढ लागू करणारा श्री छत्रपति सहकारी साखर कारखाना हा राज्यातील पहिला कारखाना असून हा कारखाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करीत आहे. सभासद व कामगार ही एकाच रथाची दोन चाके असून सभासदांच्या हिताचा विचार करताना कामगारांच्या हिताला देखील सर्वोच्च प्राधान्य देण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न आहे. त्यासाठी कारखाना कुठेही मागे राहणार नाही, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी दिली.

यावेळी कारखान्याचे संचालक, अॅड शरद जामदार, रामचंद्र निंबाळकर, शिवाजीराव निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, प्रशांत दराडे,अजित नरुटे, श्री. विठ्ठलराव शिंगाडे, श्री. अनिल काटे, बाळासाहेब कोळेकर, संतोष मासाळ, निलेश टिळेकर,सतिश देवकाते, अशोक पाटील, मंथन कांबळे, डॉ योगेश पाटील, तानाजी शिंदे, सुचिता सपकळ, माधुरी राजपुरे, कार्यकारी संचालक अशोक जाधव, फायनान्स मॅनेजर हनुमंत करवर, तांत्रिक सल्लागार महादेव निकम कामगार नेते युवराज रणवरे, सतिश गावडे, सुहास निंबाळकर, संजय मुळीक उपस्थित होते.