इंदापुरात वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीवरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात

इंदापुरात वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीवरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात

 

इंदापूर:- इंदापूर शहरातील वीरश्री मालोजीराजे भोसले यांची गढी आणि समाधीस्थळावरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी आज सकल हिंदू समाजाच्या वतीने आजपुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथे रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे.

शिवचरित्रकार अनिल महाराज देवळे आणि भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत हा रास्ता रोको केला जाणार आहे.

तत्पूर्वीच इंदापूर पोलिसांनी वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीवरील काही अतिक्रमण काढण्याच्या कारवाईला सुरुवात केली आहे.

इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी सात ऑगस्ट रोजी या गढी परिसरात असणाऱ्या अतिक्रमणधारक 14 व्यक्तींना अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात नोटीस बजावली होती.

स्वतःहून अतिक्रमण धारकांनी आपापले अतिक्रमण काढावीत असा आदेश तहसीलदार जीवन बनसोडे यांनी पारित केला होता.

मात्र अतिक्रमणधारकांनी आपली अतिक्रमणे काढून न घेतल्याने तहसीलदार जीवन बनसोडे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे,इंदापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे यांच्या उपस्थितीत सोमवारी 11 ऑगस्ट रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून मोठ्या पोलीस बंदोबस्तात या अतिक्रमणावर आता प्रशासनानं हातोडा चालवलेला आहे.