पूरग्रस्त बांधवांसाठी जीवनदायी मदतीचे आवाहन

पूरग्रस्त बांधवांसाठी जीवनदायी मदतीचे आवाहन

 

पूरग्रस्त बांधवांसाठी जीवनदायी मदतीचे आवाहन

वस्तू उद्या-सोमवारी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रिय बांधवहो,

अत्यंत भीषण पावसामुळे आपल्या अनेक गावांवर संकट कोसळले आहे. घरांचे आश्रय नाहीसे झाले, शेतपिके वाहून गेली, अन्न-पाणी तुटले आहे. आईच्या डोळ्यातून आसवे गळत आहेत, मुलं भुकेने रडत आहेत, आजारी लोक औषधांच्या प्रतीक्षेत आहेत.

या कठीण प्रसंगी आपल्या मायेचा आणि मानवतेचा हात पुढे करणे अत्यावश्यक आहे.

नटराज नाट्य कला मंडळ, बारामती, पूरग्रस्तांसाठी मदतीचे साहित्य जमा करत आहे. थोडे थोडे आपले योगदानही मोठा दिलासा ठरू शकतो.

आवश्यक साहित्य:

1. तांदूळ, डाळ, पोहे, रवा, साखर, चहा पावडर, तेल, बिस्किटे 

2. पिण्याचे पाणी (बाटल्या/कॅन)

3. साडी, ड्रेस, शर्ट-पॅन्ट, लहान मुलांचे कपडे (नवीन / जुने असतील तर स्वच्छ धुऊन, इस्त्री केलेले असावे)

4. चादरी, ब्लँकेट्स, टॉवेल, चटया, ताडपत्री, रेनकोट, छत्र्या

5. साबण, टूथपेस्ट, टूथब्रश, सॅनिटरी पॅड्स, डायपर्स

6. मच्छरदाणी, क्लोरीन गोळ्या

7. फर्स्ट एड किट, औषधे, ओआरएस

8. टॉर्च (बॅटरी) पॉवरबँक, मेणबत्ती, काडेपेटी, कछवाछाप अगरबत्ती

9. स्टील/प्लास्टिकची थाळी, वाटी, चमचे, मग, बादली 

10. लहान मुलांसाठी – लॅक्टोजेन / शिशु आहार पावडर


साहित्य जमा करण्याचे ठिकाण: 

"नटराज कलादालन", 

तिरंगा चौक, भिगवण रोड, बारामती

संपर्क:

किरण गुजर – ९३७०१६६६६६

ॲड. अमर महाडीक – ९६२३४४४४११

हनुमंत घाडगे – ७३७८४०२२६६

सचिन आगवणे – ९६२३९८८५८५

श्रीकांत गालिंदे – ९९६०५३२००८

सचिन नगरे - ९७३०४७०१०२

🙏 आपली मदत हीच त्यांची आशा 🙏

“आव्हान फक्त मदतीचे नाही, हे मानवतेचे आणि मायेचे आहे. चला, आपण मिळून आपल्या बांधवांना या संकटातून बाहेर काढूया!”

टीप: कृपया रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही.