दिल्‍लीत मुजरा करण्‍यासाठी जावू नका, शेतकर्‍यांसाठी मदत आणा : उद्धव ठाकरेंचा हल्‍लाबोल

दिल्‍लीत मुजरा करण्‍यासाठी जावू नका, शेतकर्‍यांसाठी मदत आणा : उद्धव ठाकरेंचा हल्‍लाबोल

 

मुंबई: एकत्र येऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करूया, अशी सरकारला विनंती केली. पण मुख्यमंत्री जाहिरातीत व्यस्त आहेत. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी सरकार त्यांच्याच धुंदीत आहे. तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करत नाही कारण तुमच्या अक्कलचा दुष्काळ आहे. तातडीने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करा. दिल्लीत मजुरी करण्यासाठी जाऊ नका, शेतकऱ्यांसाठी मदत आणा, अशी मागणी शिवसेना (ठाकरे गटाचे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (दि. १ केली. दसरा मेळाव्याच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

केवळ पिकाचं नुकसान नाही तर शेतकर्‍यांच्‍या जमिनींचंही अतोनात नुकसान

"अतिवृष्टीचं राज्यावर मोठं संकट आलं आहे. मी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांवरच सरकारने भार टाकला आहे. शेतकऱ्यांचं केवळ पिकाचं नुकसान झालेलं नाही, तर त्यांच्या जमिनींचंही अतोनात नुकसान झालं आहे. जनता आता हैराण झाली आहे. काही खाखर सम्राट भाजपमध्ये गेले आणि सत्तामिही मिळवली आहे," असंही त्यांनी म्हटलं.

"मुख्यमंत्री झाल्यावर शेतकऱ्यांच्या वेदना जाणवत नाहीत का?"

यावेळी देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते असताना सरकारला ओल्या दुष्काळासंदर्भात लिहिलेल्या पत्राचं वाचनही त्यांनी केलं."विरोधी पक्षात असताना जाणवणाऱ्या शेतकऱ्यांच्या वेदना मुख्यमंत्री झाल्यावर जाणवत नाहीत का?" असा सवालही त्यांनी केला."कागदी घोडे नाचवू नका, पूरग्रस्त शेतकऱ्यांना ठोस मदत करा. अतिवृष्‍टीग्रस्‍त शेतकर्‍यांना हेक्‍टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करा.पूरग्रस्तांना तात्काळ घरे बांधून द्या," अशी मागणीही त्यांनी केली. शिवसेना ठाकरे गटाच्‍या दसरा मेळाव्‍यावर ६३ कोटी रुपये खर्च झाल्‍याचा आरोप भाजप केला आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्‍हणाले की, "मी आमचे बिल पाठवतो. जे आमच्‍यावर आरोप करताना त्‍यांना तुम्‍ही द्या".

सर्व शेतकरी भाजपमध्‍ये गेल्‍यावर कर्जमाफी करणार का?

पूरग्रस्‍त जिल्‍ह्यांमध्‍ये पंचनामे कसले करत आहात. मी पिक सडल्याचा वास बघितला आहे. शेतकर्‍यांना बँकांच्‍या नोटीस येत आहेत. शेतकरी नांगरणी कसे करणार. पुढच्या हंगामाची तयारी कशी करणार. मी मुख्‍यमंत्री होतो तेव्‍हा कोणते निकष होते. आता पंतप्रधान आपत्तकालीन निधीमधथून पैसे आणा, अशी मागणही त्‍यांनी केली.काही साखरसम्राट भाजपात गेले. यानंतर त्‍यांची कोट्यवधी रुपयांची कर्जमाफी झाली;पण शेतकऱ्यांना बैलजोडी गहन ठेवायला लागते. यानंतर त्‍यांना हमी मिळते. शेतकरी कर्जाच्या ओझा खाली आहे. सगळे शेतकरी भाजपमध्‍ये केले तर कर्जमाफी करणार असे काही आहे का, असा खोचक सवालही त्‍यांनी यावेळी केला.

 

आपल्‍याकडे सारा शब्‍दांचा खेळ चालतो

आपल्याकडे शब्दाचा खेळ चालतो. मी आपत्तीग्रस्त हा शब्द वापरला. ओला दुष्काळ ही नसेल.. मा कडे तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे पत्र आहे. मी मुख्‍यमंत्री असताना त्‍यांनी माला ते लिहिले होते. मला वेदना झाल्या म्हणून मी कर्जमाफी केली. तेव्हा आमची नियत काढली गेली. आज देखील शेतकऱ्यांना मदत होत नाही. इथे त्यांचा अभ्यास चालू आहे. केंद्राचे पथक अजून देखील आलेले नाही. ते येणार कधी त्यांचे पंचनामे होणार कधी. तुम्ही त्याला ओला दुष्काळ म्हणा की काही बाकी म्हणा, असेही उद्धव ठाकरे म्‍हणाले. 80 कोटी लोकांना पंतप्रधान धान्य देतात; पण जो शेतकरी पिकवतो. त्याला तुम्ही काही तरी द्या. शाळांची स्वच्छता मोहीम सुरू करून त्या देखील सुरू केल्या पाहिजे. मोठा संकट आहे. आम्हाला राजकारण आणायचे नाही. तुम्ही आमच्या मागण्या साठी दिल्लीला गेले पाहिजे; पण त्‍यांनी जाहिरातबाजी सुरु केली आहे, असा आरोपही त्‍यांनी केला.