'या' बड्या नेत्याच्या मदतीने कुख्यात गुंड घायवळ परदेशात पळाला, माजी गृहमंत्र्यांचा आरोप
मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०२५
Edit
पुणे: पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या पलायनाने राजकारण चांगलेच तापले
आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मदतीनेच
घायवळ परदेशात पळाला असल्याचा आरोप शिवसेना नेते रविंद्र धंगेकर यांनी
आरोप केला असतानाच आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही याचा पुनरुच्चार
केला आहे. याबाबत सरकारने चौकशी करावी अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.