शेकडो वर्षाची वारकरी परंपरा रेडा गावातील पवार कुटुंबातील तिसरी युवा पिढीने चार दशकापासून जोपासली - ह. भ. प.रावसाहेब शिपलकर
रेडा गावातील पवार कुटुंबाच्या स्वागताने वारकरी गेले भारावून
कोल्हापुरी फेटे, चहापाणी, फटाक्याची आतिषबाजीने स्वागत
रेडा (ता. इंदापूर, पुणे) श्री क्षेत्र - नागेश्वर मंदिर ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा हा अहिल्यादेवीनगर जिल्हा श्रीगोंदा तालुक्यातील कौठा येथून कार्तिक शुद्ध-३ शुक्रवार दि.२४ ऑक्टोंबर २०२५ रोजी पंढरपूरकडे कार्तिकी वारीसाठी प्रस्थान झाला असून (दि.२८) ऑक्टोंबर रोजी रेडा गावात श्री क्षेत्र नागेश्वर दिंडी सोहळ्याचे आगमन होताच तोफांची सलामी देऊन फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली.पवार कुटुंबाचे प्रमुख माजी ग्रामपंचायत सदस्य सुखदेव पवार दिंडी सोहळ्याचे प्रमुख व सोहळ्याचे स्वागत केले. महिलांनी तुळशी पूजन करून दिंडी सोहळ्यातील महिलांचे स्वागत केले. श्री क्षेत्र नागेश्वर दिंडी सोहळ्याचे हे ४८ वर्ष असून रेडा गावातील पवार कुटुंब हे कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर कडे जाणाऱ्या शेकडो वारकऱ्यांचे स्वागत करत असतात.
शेकडो वर्षाची वारकरी परंपरा पवार कुटुंबातील तिसरी युवा पिढीने गेली चार दशक कार्तिकी एकादशी निमित्त जाणाऱ्या श्री क्षेत्र नागेश्वर दिंडी सोहळ्याचे स्वागत व सेवा करण्याची परंपरा जपली असून पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना कोल्हापुरी फेटे बांधून, चहापाणी, फटाक्याची आतिषबाजीने स्वागत करत असतात. या स्वागताने अक्षरशः वारकरी मंडळी भारावून जातात. दिंडी सोहळ्यातील महिलांना व मानाचे मानकरी यांना कोल्हापुरी फेटे बांधून स्वागत केल्याने महिला मंडळींच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत होता.
आषाढी वारी, कार्तिकी व वारीसाठी लाखो वारकरी मंडळी पंढरपूरकडे विठ्ठल दर्शनाची आस घेऊन अक्षरशा ऊन, वारा, पाऊस, संसाराची तमा न करता, देहभान विसरून पंढरपूरकडे जात असतात.
गुरुवर्य निवृत्ती (आण्णा)शिपलकर, वै. गुणाईमाता निवृत्ती शिपलकर यांच्या प्रेरणेने हा दिंडी सोहळा पंढरपूरकडे पायी वारी गेली ४८ वर्ष करत आहे. त्यामध्ये ह. भ. प. दत्तात्रय महाराज शिपलकर, सोमनाथ महाराज शिपलकर, रावसाहेब शिपलकर (गुरूजी), भानुदास दातीर महाराज, हरी घोडके, विणेकरी कुमार काका कुलकर्णी, चोपदार हनुमंत नारायण शिपलकर, संजय कुदळे, बाळासाहेब ढोके, वामन रांहीज,भीमसेन खरात, बाळासाहेब लगड, कैलास देशमुख, प्रकाश परकाळे, बाळासाहेब ढोके,मंगल मोटे,सुरेखा जठार, वनिता गिरमकर,सविता पवार, स्पीकर व्यवस्था संजय पवार आदी वारकरी मंडळींनी वारीतील अनुभव कथन केले.