जयंतराव कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं सांग; पडळकरांची जीभ पुन्हा घसरली

जयंतराव कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं सांग; पडळकरांची जीभ पुन्हा घसरली

 

सांगली : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका करताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची पुन्हा एकदा जिभ घसरली. भाषणाच्या प्रारंभापासून आमदार पाटील यांचा एकेरी उल्लेख त्यांनी केला. 'मंगळसूत्र चोरी' या विषयावर पडळकर यांनी खालच्या पातळीवर जाऊन आमदार पाटील यांना लक्ष्य केले. त्यांचे सहकारी दिलीप पाटील यांचा नामोल्लेखही पडळकर यांनी केला नाही; परंतु त्यांच्यावरही खालच्या पातळीवर जाऊन टीकेची झोड उठवली.

"तुझ्या कुठल्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं सांग. जयंत्या, माझं चॅलेंज आहे. माझे हात-पाय तोडण्याची भाषा करणाऱ्याने आणि जयंत्याने मला उद्याच्या उद्या पत्रकार परिषद घेऊन सांगावे मी वाळव्यात कुठे येऊ? वार व वेळ सांगावी, मी एकटा तेथे येईन," असे आव्हान त्यांनी दिले.

जयंत पाटील यांनी जतचा कारखाना ढापला

जयंत पाटील यांनी जतचा कारखाना ढापला, त्याप्रमाणे कवठेमहांकाळचा कारखानाही ढापण्याचा उद्योग चालवला आहे, असा आरोप पडळकर यांनी केला. 'लव्ह जिहाद'विरोधात तसेच पाद्रीविरोधात मी भूमिका घेतली, त्यावेळी मला बदनाम करण्याचा उद्योग जयंत पाटील यांनी केल्याचे ते म्हणाले. 'लव्ह जिहाद' विषयावर राज्यभरात ३६ मोर्चे निघाले. हे हिंदूविरोधी आहे, हे ईश्वरपूरच्या लोकांनी हे ध्यानात ठेवायला हवे, असेही पडळकर म्हणाले.