सातबाऱ्यावर पोकळ हिस्सा म्हणून नांव असणाऱ्याने मूळ सातबाऱ्यावर मालकी हक्काचा हिस्सा असणाऱ्याच्या जमिनीवर मिळवला ताबा
शनिवार, २५ ऑक्टोबर, २०२५
Edit
इंदापूर:- इंदापूर तालुक्यात एक अजबच प्रकार घडल्याचे सध्या जोरदार चर्चा असून इंदापूर तालुक्यातील एका शेतकऱ्यांच्या सातबारावर पोकळ हिस्सा नावे असणाऱ्या इसमाने परस्पर मूळ मालकी हक्काच्या जमिनीच्या हिश्याची परस्पर जमीन विक्री करून डल्ला मारल्याचा प्रकार घडलेला आहे. नेमका हा कसा प्रकार घडला की, सदर इंदापूर शहरातील मुकुंद मुरलीधर गोसावी रा. मुरलीधर मंदिर ,कासारपट्टा ता. इंदापूर, जि. पुणे यांनी इंदापूर पोलीस स्टेशनकडे ऑनलाईन तक्रारी अर्ज केला आहे त्या तक्रारीत असे म्हटले आहे की, तक्रारदार मुकुंद मुरलीधर गोसावी( वय- ४२) वर्षे व्यवसाय शेती रा. मुरलीधर मंदीर कासार पट्टा ,इंदापुर, ता. इंदापुर, जि. पुणे यांनी विरोधात लिंबराज कष्णाजी गोसावी रा. पुणे, उदय गोविंद लोंढे रा. शहा, ता. इंदापुर, जि. पुणे , माधव भगवान मोहिते रा. गलांडवाडी, ता. इंदापुर, जि, पुणे गुन्हा घडला घ. ता. वेळ व ठिकाण दिनांक ४/०९/२०२५ रोजी सकाळी ११ वा. सुमारास मौज. सरडेवाडी, ता. इंदापुर, जि. पुणे गावचे हद्दीत जमीन गट नं ७८/१ मध्ये हकिकत वर नमुद तारीख वेळी व ठिकाणी यातील विरोधक यांनी यातील तक्रारदार यांचे शेतातील सुमारे दोन एकर क्षेत्रातील ऊसाचे ऊस तोडून नुकसान केले आहे. याचा जाब तक्रारदार यांनी विचारला असता क्षेत्र आम्ही खरेदी केले आहे. येथे तुमचा काही संबंध नाही. पुन्हा रानात पाय टाकला तर दोन्ही पाय तोडून टाकु व तुम्हाला व तुमचे कुटुंबाला जिवे ठार मारू वगैरे धमकी दिली. तक्रारीची चौकशी साहेब पोलीस निरीक्षक गावडे करत आहेत.
सदर तक्रारदार किंवा अर्जदार यांनी बारामती उपविभागीय अधिकारी म्हणजेच प्रांत यांच्याकडे अपील केल्या असता प्रांत कार्यालयातील अपील याचा निकाल झाला असून तो निकाल अर्जदार यांच्या बाजूने लागला आहे.विरोधकाचे अपील रद्द करण्यात आलेले आहे असा निकाल आदेश दि. ३०/५/२०११ रोजी झाला असून तसेच तहसीलदार इंदापूर येथील निकाल दि.७/७/२००९ अर्जदाराच्या बाजूने झालेला आहे.
असे असताना सुद्धा आणि सदर अर्जदाराने वृत्तपत्रात जाहीर प्रकटन दिले असताना, लिखित तक्रार केले असताना, संबंधित तलाठी, सबरजिस्टर ,अनेक अधिकाऱ्याने या धनदांडग्यां गावगुंडा सोबत आर्थिक हितसंबंध जोपासत हा बेकायदेशीर दस्त व व्यवहार केला आहे.
सदर अर्जदार सब रजिस्टर इंदापुर यांना याच्याबाबत विचारांना केले असता मूळ कागदपत्र आमच्याकडे आलीच नाहीत. आम्ही ही कागदपत्र न पाहताच घटना घडली असून आम्ही संबंधित इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करू असं म्हणल्याचे ही त्या अर्जदाराने सांगितले.
पुढे ते काय म्हणालेत मुरलीधर गोसावी आणि इतर पाच जणांनी अशी माहिती दिली की, मौजे. सरडेवाडी येथील गट नं.- ७८/१/आ जुना गट नं.७९४+१+२ क्षेत्र ५४ एकर जुना गट नंबर ७८६ (नवीन ८०) शेत्र ९ हेक्टर ९ आर असा एकत्रित कुटुंबाचा मिळकत होती. यापैकी गट नं. ७९४ मधील अर्ध्या हिश्श्याची २७ एकर जमीन अन्नपूर्णा व २७ एकर जमीन मुरलीधर यांच्या नावे सरडेवाडी गट नं. ८० क्षेत्र ९ हे.९ आर माधव व लिंबराज यांच्या नावे करून दिली होती.
पुढे अन्नपूर्णा मयत झाल्यानंतर ७८/१/अ ,गट नं.८० माधव व लिंबराज कृष्णाजी गोसावी यांनी आपआपल्या हिश्श्याची विक्री केली तसेच गट नं.७८/१/अ जमिनीच्या उर्वरित अर्ध्या हिश्श्यावर माधव व लिंबराज यांचा काडीमोड, कवडीचाही हक्क हितसंबंध राहिला नसताना अन्नपूर्णा मयत झाल्यानंतर सन २०१२ मध्ये गट नं.७८/१/अ जमिनीच्या सातबारा वर पोकळीस्त नोंद राहिली आणि त्यांचाच गैरफायदा घेऊन लिंबराज यांनी त्याच्या हिश्शाची जमीन विकली असताना, आमच्या राहिलेल्या इशाच्या जमिनीचा आणि वरील इसमांचा काही संबंध नसताना बेकायदेशीर परस्पर आमच्या मालकी हक्काच्या हिश्शाची जमिनीची बेकायदेशीर विक्री केली आहे.