अजित पवारांनी शब्द पूर्ण केलाच; सूरज चव्हाणचा पत्र्याच्या खोलीतून अलिशान बंगल्यात प्रवेश
अलिशान, प्रशस्त आणि सुंदर आहे सूरज चव्हाणचं घर
तर साध्या पत्र्याच्या घरातून सूरज आता दोन बेडरुमच्या या बंगल्यात राहायला येणार आहेय. घर अतिशय प्रशस्त असं हे. मॉड्युलर किचन, प्रशस्त असा हॉल आहे...मोकळी जागा आहे, बेडरुम्स देखील मोठे आहेत. घराचं इंटिरिअर देखील चर्चेत आलं आहे.
त्यानं बिग बॉसची ट्रॉफी जिंकली. बिग बॉस जिंकल्यानंतरही त्याच्याकडे राहायला घर नव्हतं. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरजला घर बांधून देण्याचा शब्द दिला होता.दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच अजित पवार यांनी स्वत: या घराच्या बांधकामाची पाहणी केली होती. त्यांच्या एक्स अकाउंट वर पोस्ट शेअर करण्यात आली होती.
सूरजने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर नेटकरी आणि चाहत्यांनी त्याच्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
सूरज चव्हाणच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो झापूक झोपुक या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेला निर्माते दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरज चव्हाण याला घेऊन हा सिनेमा बनवणार असल्याची घोषणा केली होती.