पुढील 5 दिवसांत राजकीय भूकंप; सध्याच्या पंतप्रधानांना बाजूला व्हावे लागेल; तारीख सांगत पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक गौप्यस्फोट
पुढे बोलताना चव्हाण यांनी सांगितले की, जर मराठी माणूस पंतप्रधान होणार असेल, तर सध्याच्या पंतप्रधानांना बाजूला व्हावे लागेल. बदल होण्याची शक्यता दिसत आहे, पण हा बदल झाला तरी काँग्रेसचा पंतप्रधान होणार नाही, कारण काँग्रेसकडे सध्या बहुमत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
पृथ्वीरज चव्हाण यांनी यावेळी अमेरिकेतील एका कायद्याचा उल्लेख केला. 19 डिसेंबर रोजी अमेरिकेच्या संसदेत एका कायद्यानुसार काही महत्त्वाची माहिती सार्वजनिक होणार आहे. एफस्टीन नावाच्या व्यक्तीशी संबंधित एका प्रकरणात मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात काही मोठ्या नेत्यांची नावे असण्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर काही नावे व्हायरल होत आहेत. सुमारे 75 हजार फोटो आणि 20 हजार ई-मेल्स समोर येण्याची शक्यता आहे. अमेरिकन संसदेने स्पष्ट केलं आहे की, ही माहिती शोधता आणि डाउनलोड करता येईल. कोणताही मोठा नेता असला तरी त्याला संरक्षण दिलं जाणार नाही, असंही चव्हाण यांनी सांगितलं.