अजितदादांवर पिंपरी चिंचवडमध्ये प्रचंड प्रेमाचा वर्षाव; जनतेच्या अफाट प्रतिसादाने घेतली प्रचारात प्रचंड आघाडी
अफाट गर्दीचा उत्स्फूर्त प्रतिसाद.. राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळाचा टिपेला पोहोचलेला गजर.. अजितदादांच्या जयघोषाने दुमदूमून गेलेला परिसर.. पिंपरी चिंचवडला पूर्वीचे वैभव प्राप्त करुन देण्याची धमक फक्त अजितदादा पवार यांच्यातच आहे, हा प्रत्येक चेहर्यावर दिसणारा विश्वास.. त्याच विश्वासातून एकवटलेली जनशक्ती.. त्या जनशक्तीला अजितदादांनी दिलेली साद आणि त्याला मिळालेला प्रचंड प्रतिसाद, अशा अभुतपूर्व वातावरणात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पिंपरी चिंचवडच्या नवविकासाचे शिल्पकार अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फोडून महानगरपालिका निवडणुकीत प्रचंड मोठी आघाडी घेतली.
रविवारी सायंकाळी अजितदादा पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरातील तळवडे आणि चिखली येथे प्रचाराचे नारळ फोडले. या दोन्ही ठिकाणी झालेल्या त्यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. अजितदादा पवार यांनी गेली 8 वर्ष वगळता त्यापूर्वी सलग 25 वर्षे पिंपरी चिंचवड शहराचे नेतृत्व केले. त्यांच्याच एकमुखी, कणखर, खंंबीर आणि तडफदार नेतृत्वाखाली त्या काळात या शहराच्या विकासाला प्रचंड मोठी गती मिळाली. त्याच काळात देशातील सर्वोत्कृष्ट स्मार्ट सिटीचा पुरस्कार मिळाला. अजितदादांच्या 25 वर्षांच्या नेतृत्वाखालील कारभारात ज्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला कधीही एक रुपयाचे कर्ज काढावे लागले नाही, तीच पिंपरी चिंचवड महानगरपालिका आज कर्जबाजारी झाली आहे. मिनी भारत म्हणून ओळखली जाणारी जी पिंपरी चिंचवड नगरी अजितदादांच्या नेतृत्वाच्या काळात सामाजिक सलोखा राखून होती तीच पिंपरी चिंचवड नगरी आज काहीजण जातीय तेढ निर्माण करुन दुषित करत आहेत. अजितदादांच्या खमक्या नेतृत्वाखाली ज्या पिंपरी चिंचवड नगरीत सर्वसामान्य जनतेचे हित पाहिले जात होते त्याच पिंपरी चिंचवड नगरीत गेल्या आठ वर्षात फक्त वेगवेगळ्या क्षेत्रातील माफिया गँग तयार करुन स्वत:च्या तुंबड्या भरण्याचे काम सुरु आहे. या सार्या सार्याचा राग आज जमलेल्या प्रचंड गर्दीतून व्यक्त होत होता. अजितदादांशिवाय या शहराला पर्याय नाही हा दृढ विश्वास प्रत्येकाच्या बोलण्यातून व्यक्त होत होता.
तळवडे, चिखली येथे झालेल्या सभेला अबालवृद्धांसह विशेषत: तरुणाईची आणि महिलांची उपस्थितीत फारच मोठी होती. अजितदादांनी या जनतेशी साधलेला संवाद केवळ तळवडे, चिखलीच नव्हे तर संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात चैतन्य निर्माण करुन गेला. बारामती जरी माझी जन्मभूमी असली तरी माझी कर्मभूमी पिंपरी चिंचवड आहे हे सारा महाराष्ट्र जाणतो. पिंपरी चिंचवड शहरात महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील आणि देशाच्या प्रत्येक राज्यातील लोक राहतात. त्याांन सामाजिक, सार्वजनिक सुरक्षा, विश्वास आणि दिलासा देणारे पूर्वीचे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी राष्ट्रवादीला पाठबळ द्या, असे अजितदादांनी आवाहन केले. त्या आवाहनाला अक्षरश: दोन्ही हात उंचावून तमाम जनतेने प्रतिसाद दिला.
फेकूगिरी करण्यात पटाईत असणार्या विरोधकांनी कितीही कसलेही आव आणले तरी पिंपरी चिंचवड शहराची मानसिकता काय आहे ते आजच्या दोन सभांमधून स्पष्ट झाले आहे. अजितदादा पवार हेच या शहराचे हित राखू शकतात. तेच या शहराला पुन्हा प्रगतीच्या वाटेवर गतिमान करु शकतात. अजिदादांच्या नेतृत्वाच्या काळात टेंडर पद्धती कशी होती आणि गेल्या आठ वर्षात 30 ते 40 टक्यांनी टेंडर वाढवून कोणी स्वत:चे इमले उभारले. ते करताना पिंपरी चिंचवड शहरातील जनतेचा पैसा स्वत:च्या मालकीची जहागिरी असल्यासारखे वर्तन कोणाचे राहिले? फरक स्पष्ट दिसत आहे. तो दिसत असताना पिंपरी चिंचवड शहरातील जनता डोळ्यावर पट्टी बांधून आता गप्प बसणार नाही. ज्यांनी या शहराच्या खेळ खंडोबा करण्याचा, या शहराच्या विकासाची आणि सामाजिक सलोख्याची वाट लावण्याचा प्रयत्न केला त्यांना धडा शिकवून अजितदादांच्या हाती पुन्हा एकदा या शहराची सूत्रे देणार हे आजच्या धडाकेबाज सभांनी निश्चित केले आहे.