आधी मुलीची छेड काढली, मग जाब विचारणाऱ्या आईवडिलांना मारहाण केली जय जरांगे याच्यावर बारामतीत गुन्हा दाखल
बारामती: एका अल्पवईन मुलीची छेड काढणाऱ्या मुलांना आई वडिलांनी जाब विचारला त्याच्या राग मनात धरून चार जणांच्या टोळक्यानी मुलीच्या आई वडिलांना घरात घुसून मारहाण केली. याबाबत जय जरांगे याच्या सह तीन जणांवर बारामती तालुका पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामतीत शिक्षणाच्या निमित्ताने येणाऱ्या या मुलांच्या टोळक्याने धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला यावरून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिक्षणाच्या निमित्ताने आलेले एक कुटुंब एम आय डी सी. परिसरात राहते. त्यांची तेरा वर्षाची मुलगी बाहेर पडताच काही मुले तीला खूणवतात बोलावून घेऊन तीचा घरचा नंबर किंवा इन्स्टा आय डी मागण्याचा प्रयत्न करत आहेत. अशी तक्रार मुलीने आई वडिलांकडे केली. त्यावर त्या मुलीच्या आई वडिलांनी त्या मुलाला जाब विचारला, याचा राग मनात धरून त्यानें संध्याकाळी त्याच्या मित्राना बरोबर घेऊन मुलीच्या घरी जाऊन तिच्या आई वडिलांना मारहाण केली.
याबाबत मुलीच्या आई ने बारामती तालुका पोलीस ठाण्यात जय जरांगे, आदित्य दातखिळ, स्वप्नील पावणे, या तिघांसहित आणखी एकावर गुन्हा दाखल केला आहे. यातील एका आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली असून बाकीचे आरोपी फरार झाले आहेत. मुलींच्या छेडछाडीचे तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाही असा इशारा या कारवाईच्या निमित्ताने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड तसेच बारामती तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला आहे.