महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

 

महापरिनिर्वाण दिन हा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे. दरवर्षी ६ डिसेंबर रोजी हा दिवस संपूर्ण देशभर, विशेषतः महाराष्ट्रात, मोठ्या आदराने आणि श्रद्धेने पाळला जातो.

६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे दरवर्षी ६ डिसेंबरला जगातून, तसेच देशभरातून मोठ्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर एकत्र येतात आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करतात. त्यांच्या महान कार्याची आठवण ठेवण्यासाठी, त्यांना आदरांजली वाहण्यासाठी हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो.

दरवर्षी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी देशासह जगभरातील अनुयायी चैत्यभूमी (दादर) शिवाजी पार्क येथे दाखल होतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण एकमेकांना मेसेज पाठवून या महामानवाच्या स्मृतीस उजाळा देतात. त्याप्रमाणे तुम्हीदेखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तुम्ही खास HD Images, WhatsApp Status, Messages द्वारे महामानवाच्या स्मृतींना अभिवादन करू शकता.

डॉ. बाबासाहेबांचे काही प्रेरणादायी विचार…

  • स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांसारख्या मूल्यांना एकत्र आणून लोकशाहीची प्रगती साधता येते.
  • धर्म माणसाकरिता असावा, माणूस धर्माकरिता नसावा.
  • स्वतःवर विश्वास ठेवणे आणि ध्येयासाठी संघर्ष करणे महत्त्वाचे आहे.