शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत आयोजित स्नेहभोजनाला देशातील अनेक नामांकित व्यक्तींची उपस्थिती

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत आयोजित स्नेहभोजनाला देशातील अनेक नामांकित व्यक्तींची उपस्थिती

 

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (१० डिसेंबर) राजधानी दिल्लीत आयोजित स्नेहभोजनाला देशातील अनेक नामांकित व्यक्तींनी उपस्थिती लावली. १२ डिसेंबरला येणाऱ्या त्यांच्या वाढदिवसाचा शुभारंभ म्हणून हा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पवारांच्या दिल्ली निवासस्थानी संध्याकाळपासूनच राजकीय, सामाजिक, उद्योगक्षेत्रातील दिग्गजांची वर्दळ सुरू झाली.

या कार्यक्रमात सर्वात चर्चेत राहिली ती अजित पवार, पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची हजेरी, तर उद्योगक्षेत्रातून गौतम अदानी हे विशेष पाहुणे उपस्थित राहिले. त्याचवेळी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनीही पवारांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. भाजप, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे), शिवसेना (शिंदे), तृणमूल, डीएमके यांसह अनेक पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येत उपस्थिती नोंदवल्याने हा कार्यक्रम ‘दिल्लीतील सर्वात चर्चेतला राजकीय क्षण’ ठरला.

दिल्लीत पवारांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या मान्यवरांची यादी

गौतम अदानी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, जयवीर शेरगिल, कनिमोळी (DMK) काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई, शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई, तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन, लालकृष्ण अडवाणी यांच्या कन्या प्रतिभा आडवाणी, माझी अर्थमंत्री पी चीदंबरम,  त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री विप्लव देव, राजीव शुक्ला, गुलाम नबी आझाद, माजी मंत्री व भाजप नेते शहनवाज हुसेन, भाजपचे नेते रबनीत सिंग बिट्टू, भाजपच्या डी पुरंदरेश्वरी, काँग्रेसचे मनीक्कम टागोर, काँग्रेस नेते कमलनाथ, दिग्विजयसिंह, ओमर अब्दुल्ला, महाराष्ट्रातून शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने, भाजपचे खासदार अनुप धोत्रे सहकुटुंब आले होते. 

भाजपचे दिल्लीचे मंत्री प्रवेश वर्मा, आपचे खासदार राघव चड्डा, भाजपचे खासदार बैजयंत पांडा, काँग्रेस नेते सचिन पायलट, पार्थ पवार, शिवसेनेचे नेते श्रीकांत शिंदे, मिलिंद देवरा, भाजपचे खासदार निशिकांत दुबे, समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन,  भाजपचे खासदार नवीन जिंदाल, कपिल सिबल शक्तीसिंह गोहिल, रणदीपसिंह सुरजेवाला, मुकुल रोहदगी, तृणमूल काँग्रेसच्या खासदार सागरिका घोष, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या समावेश होता.