राज्यस्तरीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेत ज्ञानसागर गुरुकुलच्या सोहेल खाचा दुसरा क्रमांक
बारामती : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय किकबॉक्सिंग क्रीडा स्पर्धांचे आयोजन तालुका क्रीडा संकुल, आमगाव येथे करण्यात आले. दिनांक 4 डिसेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत पार पडलेल्या या स्पर्धांना राज्यभरातून अनेक प्रतिभावान खेळाडूंनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत चुरशीच्या लढती साकारल्या.
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत ज्ञानसागर गुरुकुलचा उमदा खेळाडू सोहेल मुस्ताक खान याने आपली ताकद, कौशल्य आणि शिस्तबद्ध खेळाची उत्कृष्ट सांगड घालत -१७ वर्ष वयोगटातील -४० किलो वजनगटात महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.
त्यांनी सांगितले की, “सोहेलने मेहनत, शिस्त आणि चिकाटीच्या जोरावर राज्यस्तरावर चमक दाखवली आहे. पुढील स्पर्धांमध्ये तो निश्चितच सुवर्णपदक पटकावेल, अशी आम्हाला खात्री आहे.” या कामगिरीमुळे विद्यालयात, गावात आणि परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पालक, मित्रपरिवार आणि शिक्षकांकडून सोहेलवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. राज्यस्तरीय पातळीवर मिळवलेले हे यश सोहेलच्या क्रीडा प्रवासाला नवी दिशा देणारे ठरणार आहे.
सोहेलने आपल्या कामगिरीमुळे शालेय क्रीडा विश्वात ठसा उमटवत इतर विद्यार्थी-खेळाडूंना प्रेरणादायी उदाहरण दिले आहे. आगामी स्पर्धांमध्येही महाराष्ट्रासाठी आणि शाळेसाठी तो आणखी मानाचे तुरे रोवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.