अहिल्यादेवी होळकरांचे नाव काढून तुम्हाला अजितदादांचे नाव द्यायचे आहे का? लक्ष्मण हाकेंचा सरकारला सवाल

अहिल्यादेवी होळकरांचे नाव काढून तुम्हाला अजितदादांचे नाव द्यायचे आहे का? लक्ष्मण हाकेंचा सरकारला सवाल

 

बारामती: तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीतील शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाला महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव नामकरण केलेले होतं. त्यांच्या नावात बदल करण्याचा प्रकार येथे होतो आहे त्याच्या निषेधार्थ एकत्रित आलो आहे. आमचा अजित दादांच्या नावाला इतर कुठे संस्थांना नामकरण होत असेल तर आमचा विरोध नाही. मात्र अहिल्यादेवी होळकरांच्या नावात छेडछाड करण्याचा प्रयत्न कोणत्या महाभागाच्या डोक्यातून पुढे आलेला आहे? महान कार्य देशभरामध्ये उभ करणाऱ्या हजारो अहिल्यादेवी होळकरांच्या फॉलोवरच्या विरोधात जाऊन नावात खडाखोड कोणाला करावीशी वाटते याचा शोध घेण्यासाठी आलो असल्याचे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सांगितले आहे. शासनाने काढलेल्या नवीन जीआरबाबत ते बारामतीत आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.  

हाके म्हणाले, शासनाला इशारा देत आहोत. तुम्ही जो जीआर काढला आहे तो तात्काळ रद्द करावा. जो शिंदे आणि फडणवीस यांनी होळकरांच्या नावाचा जो जीआर आहे. त्यात तात्काळ दुरुस्ती महाविद्यालय व स्वरोपचार रुग्णालय करावे. काही पुढारी सर्वोच्च रुग्णालयाला वेगळे नाव देऊ इच्छितात त्यांना सांगतो की,  त्याचे देखील नाव अहिल्यादेवी होळकरांचेच आहे. हे नाव उतरवणार का? काढणार का तुम्ही? दादांचे नाव द्यायचे असेल तर कृषी विज्ञान केंद्राला द्या. आम्ही स्वागत करू. मात्र होळकरांच्या दिलेल्या नावात चर्चा करून तुम्हाला त्या ठिकाणी अजित दादांचे नाव द्यायचे आहे का? हे सुनेत्रा पवारांना देखील माहित नसावं. आम्ही त्यांचीही भेट घेऊ. तुम्ही ऐकणार नसाल तर दुर्दैवाने आम्हाला या गोष्टीसाठी आंदोलन करावे लागेल. एका बाजूला तुम्ही सांगताय की दादांच्या जाण्याने आम्हाला दुःख झालेला आहे. मात्र अहिल्यादेवी होळकरांचे नाव काढून त्या ठिकाणी अजित पवारांचे नाव देणे सुनेत्रा पवारांना देखील आवडणार नाही. कारण त्या महिला पहिल्या उपमुख्यमंत्री आहेत. जनसामान्यांच्या कैवारासाठी काम करणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांचे नाव बदललं जात असेल त्यासाठी निषेध करण्यासाठी इथे जमलो आहोत. या जीआरमध्ये जर बदल झाला खडाखोड झाली तर महाराष्ट्रात गावागावात खूप मोठे जन आंदोलन आम्ही उभे करू असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.