मॉरिशसच्या उच्चायुक्त शीलाबाई बाप्पू,  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला

मॉरिशसच्या उच्चायुक्त शीलाबाई बाप्पू, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला

 

मुंबई: मॉरिशस प्रजासत्ताकाच्या भारतातील उच्चायुक्त श्रीमती शीलाबाई बाप्पू यांनी सोमवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची मुंबईतील ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

या भेटीदरम्यान भारत आणि मॉरिशस या दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने विविध विषयांवर चर्चा झाली. महाराष्ट्र आणि मॉरिशस यांच्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक नातेसंबंध, व्यापार व गुंतवणुकीच्या संधी, पर्यटन क्षेत्रातील सहकार्य तसेच सांस्कृतिक देवाणघेवाण वाढविण्याबाबत दोघींमध्ये सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.

या प्रसंगी मॉरिशसचे काउन्सिल जनरल डॉ. डी. के. बकटोवार, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख तसेच श्री. दयानंद बापू उपस्थित होते.