युवा नेते जय पवार यांच्या या कृतीनं अजितदादांची आठवण; अजान सुरु होताच थांबवलं भाषण
सोमवार, १३ एप्रिल, २०२६
Edit
बारामती: अजितदादा पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणुक होत आहे.. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ युवा नेते जय पवार हे बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागाचा दौरा करत आहेत.. स्थानिक पातळीवरील समस्या समजून घेतानाच ग्रामस्थांशी ते संवाद साधत आहेत.. आज सिद्धेश्वर निंबोडी येथे गावभेट दौऱ्यादरम्यान जय पवार हे ग्रामस्थांशी संवाद साधत असताना अजान सुरु झाली.. त्यावेळी जय पवार यांनी आपलं भाषण थांबवलं.. अजान संपल्यानंतर त्यांनी पुन्हा आपल्या भाषणाला सुरुवात केली.. त्यावेळी त्यांनी अजितदादांच्या आठवणींनाही उजाळा दिला.. जय पवार यांची ही कृती उपस्थितांना अजितदादांची आठवण करुन देणारी ठरली.. दरम्यान, गाव भेट दौऱ्याच्या निमित्तानं संवाद साधताना जय पवार हे अजितदादाच्या आठवणीत भावूक झाल्याचं पहायला मिळालं.