बारामती येथे महिलांवर अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबास दंडासह ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

बारामती येथे महिलांवर अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबास दंडासह ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

 

बारामती: बारामती येथील जिल्हा न्यायाधिश मे. एस. आर. पाटील यांचा भोंदूबाबा यांना पैशाचा पाउस पाडण्याचे आमीश दाखवून लैंगीक अत्याचार करणा-या भोंदुबाबा मिलिंद मदन जाधव रा. धोपवे ता. गुवाघर जि. रत्नागीरी यांस
बारामती येथील जिल्हा न्यायाधिश मा. एस. आर. पाटील यांनी दि. ६/०४/२०२६ रोजी बी. एन. एस. ३१८ (४) व जादुटोना कायदा कलम २ (१) (बी) r / W ३ प्रमाणे न्यायालयाने आरोपीस ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व १५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावलेली आहे.या प्रकरणाची हकीकत आरोपी मिलींद जाधव याने फिर्यादी आणि इतर महिला साक्षीदारांना पैशाचा पाउस पाडून देतो असे खोटे अमीश दाखवले होते त्यासाठी आरोपीने आघोरी पुजेचे आयोजन करूण महिलांना विवस्त्र आवस्थेत बसवून त्यांच्यावर अत्याचार केले तसेच पुजेचे नावाखाली अर्थिक फसवणूक केली असल्याने यातील पिडीता यांनी बारामती तालुका पोलीस ठाणे येथे गु.रं.नं. ४०५ / २०२६ बीएनएस ६४, ६९, ३१८ (४),अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध अधिनियम २०१३ कलम २, ३, ५ अन्वये सदर आरोपी विरूध्द फिर्याद दाखल केली होती. सदर गुन्हयाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत यांनी पुर्ण करूण आरोपी विरूध्द दोषारोपपत्र मे न्यायालयात दाखल करण्यात आले होते. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. ज्ञानदेव साहेबराव शिंगाडे यांनी एकूण ७ साक्षीदार तपासले, वैधकीय अधिकारी व तपासी अधिकारी यांची साक्ष ग्राहय धरूण व सरकारी वकील अॅड. ज्ञानदेव साहेबराव शिंगाडे यांचा युक्तीवाद ग्राहय धरूण यातील आरोपीस बारामती येथील जिल्हा न्यायाधिश मा. एस. आर. पाटील यांनी दि. ६/०४/२०२६ रोजी बी. एन. एस. ३१८ (४) मध्ये २ वर्षे शिक्षा व ५ हजार रूपये दंड तसेच जादुटोना कायदा कलम २ (१) (बी) r/w ३ प्रमाणे न्यायालयाने आरोपीस ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व १० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावलेली आहे.विशेष सरकारी वकील ज्ञानदेव साहेबराव शिंगाडे यांनी सदर खटल्याचे पूर्ण कामकाज पाहिले व त्यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन न्यायालयाने आरोपी मिलींद मदन जाधव यांस वरील प्रमाणे शिक्षा सुनावली आहे. सदर खटल्यामध्ये सरकारी
वकील ज्ञानदेव शिंगाडे यांना सरकारी वकील कार्यालयाचे क्लार्क सौ. सुनीता सतीष कांबळे यांनी तसेच कोर्ट पैरवी अधिकारी पी. एस. आय. गोरख कसपटे, व सहायक फौजदार अभिमन्यु कवडे तसेच कोर्ट अंमलदार पोलीस हवालदार रेणुका पवार यांनी सहकार्य केले.या निकालामुळे समाजात भोंदुगिरी करणा-या विरूध्द कडक संदेश गेला आहे.