पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक संपन्न

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक संपन्न

 

पुणे: पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, पक्षाचे विविध पदाधिकारी यांची आज आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीत पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासह विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. तसेच जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.


आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली पक्षाची विचारधारा आणि विकासाभिमुख भूमिका अधिक सक्षमपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, तसेच सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाची गती कायम ठेवावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असून, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने अधिक जबाबदारीने काम करावे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.