बारामती दौऱ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची निरा येथे वारकरी सप्ताह सोहळ्यास उपस्थिती; अजितदादांच्या जनसेवेच्या कार्याला दिला उजाळा
रविवार, २४ मे, २०२६
Edit
बारामती: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार या बारामती दौऱ्यावर असताना त्यांनी निरा येथे आयोजित श्री संत शिरोमणी सावता महाराज वारकरी सप्ताह सोहळ्यास उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी वारकरी सप्ताहाच्या ठिकाणी लोकनेते दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
यावेळी उपस्थित वारकरी बांधवांशी संवाद साधताना सुनेत्रा पवार यांनी अजितदादांच्या कार्याची आठवण करून दिली. “मानवता हाच धर्म व मानव सेवा हीच ईश्वरसेवा, याच विचारांवरती दादांनी जनसेवेचा वसा अखंडपणे अविरत सुरू ठेवला होता,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या प्रसंगी मोठ्या संख्येने वारकरी, नागरिक तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
