पद्मश्री पुरस्कार मिळताच रोहित शर्मा भावुक
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि भारताला 2024 चा टी-20 विश्वचषक व 2025 ची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणारे कर्णधार रोहित शर्मा यांना, गेल्या दोन दशकांतील भारतीय क्रिकेटमधील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी संध्याकाळी राष्ट्रपती भवनात रोहित शर्मा यांचा सन्मान केला. रोहित शर्मा यांनी भारतासाठी आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना 23 जून 2007 रोजी खेळला होता. पजानेवारीमध्ये हे पद्मश्री पुरस्काराची नावे घोषित केली होती. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. आता यानंतर पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर रोहितने सोशल मीडियावर एक पोस्ट केली. या पोस्टची आता जोरदार चर्चा होत आहे.
रोहित शर्माने पोस्टमध्ये लिहिले की, “23 जून हा दिवस खूप जादू घेऊन येतो. 19 वर्षांपूर्वी, भारताची कॅप मिळण्याने या सगळ्याची सुरुवात झाली होती. आज, यात आणखी एका अभिमानास्पद अध्यायाची भर पडली आहे.” रोहित शर्मा हा जगातील सर्वोत्तम सलामीवीरांपैकी एक आहे. रोहितने तिन्ही फॉरमॅटमध्ये फलंदाजी आणि कर्णधारपद या दोन्हीमध्ये प्रभावी कामगिरी दाखवली आहे. आपल्या कारकिर्दीची सुरुवात मधल्या फळीतील फलंदाज म्हणून करून, रोहितने 2013 मध्ये सलामीवीर म्हणून खेळायला सुरुवात केली. रोहित शर्माने 23 जून 2007 रोजी आयर्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याने 19 सप्टेंबर 2007 रोजी टी20 आंतरराष्ट्रीय पदार्पण आणि नोव्हेंबर 2013 मध्ये कसोटी पदार्पण केले.
धोनीनंतर रोहित हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने आशिया कप, टी-20 विश्वचषक 2024 आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकली. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीतही पोहोचला होता.