राजनाथ सिंह दिसताच सुप्रिया सुळे पुढे गेल्या अन् पाया पडल्या; सर्वपक्षीय बैठकीतील व्हिडीओ समोर
तृणमूल काँग्रेस आणि उद्धवसेनेचे बंडखोर खासदार या बैठकीला उपस्थित होते, त्यामुळे जोरदार वाद झाला. त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. मात्र, एका संक्षिप्त प्रतिकात्मक निषेधानंतर सर्व पक्ष बैठकीत पुन्हा सामील झाले. सत्ताधारी पक्ष आणि सर्व विरोधी पक्ष अधिवेशनासाठी सज्ज झाले आहेत. विशेष अधिवेशनात मंजूर न झालेली विधेयके मंजूर करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, तर दुसरीकडे विरोधी पक्ष सरकारला कोंडीत पकडण्याचे मार्ग शोधत आहे.
केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा हेही यावेळी उपस्थित होते
बैठकीनंतर सुप्रिया सुळे राजनाथ सिंह यांना वाकून नमस्कार केला. सुप्रिया सुळे सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहण्यासाठी त्या रविवारी दिल्लीत होत्या. बैठकीतून परतत असताना त्यांची भेट राजनाथ सिंह यांच्याशी झाली. संरक्षण मंत्र्यांना पाहताच त्यांनी त्यांच्या पाया पडल्या. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा हेही यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी आपला पक्ष एनडीएमध्ये सामील होईल किंवा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होईल, याबाबतचे दावे फेटाळून लावले. सुप्रिया सुळे यांनी यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील कोणताही मित्रपक्ष किंवा काँग्रेस यापैकी कोणीही शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाकडे असा कोणताही प्रस्ताव ठेवलेला नाही.