बारामतीत 'दोन नवीन नगरसेवक'? नगरपरिषदेच्या पत्रकामुळे रंगली चर्चा
शुक्रवार, ३१ जुलै, २०२६
Edit
बारामती: बारामती नगरपरिषदेकडून प्रसिद्धीसाठी जारी करण्यात आलेल्या एका अधिकृत पत्रकात कसबा परिसरातील सूरज सातव आणि प्रतीक ढवान यांचा उल्लेख नगरसेवक म्हणून करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सदर पत्रक प्रसिद्ध झाल्यानंतर शहरात विविध चर्चांना उधाण आले असून, “बारामतीत दोन नवीन नगरसेवकांची भर पडली का?” असा उपरोधिक सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नगरपरिषदेच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात अशा प्रकारची वस्तुस्थितीविरोधी माहिती कशी प्रसिद्ध झाली, याबाबत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संबंधित पत्रक तयार करताना कोणतीही पडताळणी करण्यात आली नव्हती का, असा सवालही उपस्थित होत आहे.
या चुकीमुळे नगरपरिषदेकडून माहिती प्रसिद्ध करताना आवश्यक ती दक्षता घेतली जाते का, यावरही चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या प्रकरणी नगरपरिषदेकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण किंवा दुरुस्तीपत्रक जारी करण्यात आलेले नाही.