हा तर महिलेच्या सन्मानावर झालेला आघात : जय पवार

हा तर महिलेच्या सन्मानावर झालेला आघात : जय पवार


 बारामती: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेस नेत्यांनी वापरलेली भाषा ही केवळ एका व्यक्तीवर केलेली टीका नसून निष्ठा, कठोर परिश्रम, जनसेवा आणि स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर समाजात मानाचे स्थान निर्माण करणाऱ्या प्रत्येक महिलेच्या सन्मानावर झालेला थेट आणि निषेधार्ह आघात आहे, या शब्दात राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र जय पवार यांनी काँग्रेसचा समाचार घेतला.

जय पवार यांनी समाजमाध्यमावर याबाबत पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यात ते म्हणाले, सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत. राजकीय मतभेद असू शकतात. परंतु महिलांचा सन्मान, प्रतिष्ठा आणि व्यक्तिमत्त्वाला कमी लेखणारी अथवा त्यांचा अवमान करणारी भाषा कोणत्याही सुसंस्कृत लोकशाहीत कधीही स्वीकारली जाऊ शकत नाही.