अंतरवाली सराटीला पुणे जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, पिंपरी-चिंचवड मधून हजारो मराठा बांधव जाणार

अंतरवाली सराटीला पुणे जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, पिंपरी-चिंचवड मधून हजारो मराठा बांधव जाणार

 

पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी पुणे जिल्ह्या तील इंदापूर,बारामती, पिंपरी-चिंचवड आदी शहरातून हजारो मराठा बांधव अंतरवाली सराटी (जालना) येथे जाण्यासाठी सज्ज झाले आहेत.मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आणि एकता दाखवण्यासाठी एकूणच  पुणे जिल्ह्यासह पिंपरी- चिंचवड मधील नागरिकांत मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

या दौऱ्याच्या माध्यमातून अंतरवाली सराटी येथे जाणाऱ्या मराठा बांधवांकडून आरक्षणाचा लढा अधिक तीव्र केला जाणार असून, आंदोलनाला बळ देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक या प्रवास-आंदोलनात सहभागी होणार आहेत.