टी.सी.कॉलेजमध्ये राज्यस्तरीय नेटबॉल पंच प्रशिक्षण व परीक्षा  संपन्न

टी.सी.कॉलेजमध्ये राज्यस्तरीय नेटबॉल पंच प्रशिक्षण व परीक्षा संपन्न

 

बारामती : नेटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया [NFI]ॲमेच्युअर नेटबॉल स्पोर्टस् असोसिएशन ऑफ महाराष्ट्र [ANSAM] व टी.सी. कॉलेज बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य स्तरीय नेटबॉल पंच प्रशिक्षण शिबिराचे आयोजन शनिवार दि.३१ऑक्टोबर ते रविवार १ नोव्हेंबर या कालावधीत टी.सी. कॉलेज बारामती येथे  आयोजित करण्यात आले. 

       महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यातून १०० हून अधिक प्रशिक्षणार्थी या शिबिरासाठी उपस्थित  होते.या पंच प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन टी.सी. कॉलेज प्रशासन भवनाचे सेमिनार हॉलमधे संपन्न झाला.या प्रसंगी ॲमेच्युअर नेटबॉल स्पोर्टस् असोसिएशन महाराष्ट्राच्या सन्माननीय अध्यक्षा आंतरराष्ट्रीय नेटबॉल खेळाडू शरयू जगताप,सेक्रेटरी ऋतुराज यादव सर, ऑब्झर्वर पवन पटले सर,टी.सी.कॉलेजचे क्रीडा संचालक डॉ. गौतम जाधव सर, उपाध्यक्ष गणेश चौधरी, एक्झिक्युटिव्ह मेंबर महेशकुमार काळदाते, वरून पोमणे,प्रतीक कंग्राळकर,अनिकेत देशमुख,केतन दुगड, अविनाश वाघ,गणेश म्हस्के,रमेश नांदेडकर, योगेश उगले,विनय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.शनिवार

३१ सकाळी दहा वाजता उपस्थिती व नोंदणी करण्यात आली,पहिल्या  सकाळचे सत्रामध्ये ऑन लाइन प्रशिक्षणाचे नियो जन करण्यात आले.हे ऑनलाइन प्रशिक्षण व दुपार सत्रात नेटबॉल खेळाच्या नियमांचे व आंतरराष्ट्रीय स्तरावर बदल झालेल्या नियमांचे सखोल मार्गदर्शन कर ण्यात आले.हे मार्गदर्शन नेटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष श्री. विक्रमादित्य सर यांनी केले.सायंकाळचे सत्रात पंच व तांत्रिक अधिकारी यांनी नेटबॉल खेळाचे गुणपत्रक कसे भरावे याबाबत प्रत्यक्ष लाईव्ह सामन्याद्वारे सर्व पंचांना प्रशिक्षण देण्यात आले.

दुसऱ्या दिवशी सकाळ सत्रात सर्व पंच व प्रशिक्षकांची मैदानावर फिजिकल टेस्ट घेण्यात आली त्यानंतर प्रत्यक्ष सामन्याद्वारे उपस्थित सर्व पंच व प्रशिक्षकांना पंचांचे कर्तव्य,अधिकार व जबाबदारी,पंचांनी द्यावयाचे सिग्नल याचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले.सर्व पंच व प्रशिक्षकांना टी-शर्ट, कॅप,व्हिसल व नियमाव लीचे वाटप करण्यात आले.दुपारचे सत्रात नेटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष हरिओम कौशिक साहेब, अमित अरोरा सर, अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ.अविनाश जगताप सर यांनी सर्व नेटबॉल पंच व प्रशिक्षकांना ऑनलाइन मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या तसेच उपस्थित पंच व प्रशिक्षकांच्या शंकांचे निरसन केले.

राज्यस्तरीय पंच प्रशिक्षण कार्यशाळेसाठी उपस्थित सर्व पंच प्रशिक्षकांना अध्यक्ष शरयू जगताप,सेक्रेटरी ऋतुराज यादव सर, ऑब्झर्वर पवन पटले सर यांनी  मार्गदर्शन केले व संघटनेची ध्येयधोरणे, सर्व अधिकृत स्पर्धा, नेटबॉल खेळासंबंधी, नियमासंबंधी आवश्यक त्या सूचना दिल्या. उपस्थित पंच व प्रशिक्षक यांचे वतीने प्रा. डॉ. रमेश नांदेडकर,  राष्ट्रीय पंच गणेश म्हस्के, पवन जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा.डॉ.गौतम जाधव सर यांनी सर्वांचे आभार मानले.

आयोजन समिती म्हणुन पुणे नेटबॉल स्पोर्ट्स फेडरेशनने भोजन तसेच टी.सी.कॉलेज, बारामती यांनी निवास व मैदान व्यवस्थेचे अतिशय सुंदर असे नियोजन केले होते त्यामुळे हे पंच प्रशिक्षण शिबिर उत्कृष्ठ व नियोजनबद्ध पार पडले.

या कार्यक्रमास संस्थेचे सचिव मिलिंद शाह (वाघोलीकर) यांनी शुभेच्छा दिल्या.