सोमेश्वर कारखान्याच्या सत्तेवर शिक्कामोर्तब! ‘या’ पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड
बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया आज पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत बंडखोरीच्या ट्विस्टनंतरदेखील सुनेत्रा पवार गटाचे सर्व २१ उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सोमेश्वर सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत २१ पैकी सर्व २१ जागांवर विजय मिळवला होता.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी युवा नेते जय पवार उपस्थित होते.