आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नाविन्यपूर्ण प्रयोगांच्या माध्यमातून शेतीला नवी दिशा द्या; शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी कृषी महोत्सव महत्त्वपूर्ण ठरेल – उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार

आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नाविन्यपूर्ण प्रयोगांच्या माध्यमातून शेतीला नवी दिशा द्या; शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी कृषी महोत्सव महत्त्वपूर्ण ठरेल – उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार

 

२१ व्या राज्यस्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या हस्ते उद्घाटन

शेतीत AI आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवा; शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी कृषी महोत्सव दिशादर्शक ठरेल – सुनेत्रावहिनी पवार

बदलत्या हवामानाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब आवश्यक – उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार

कराड :  शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) अवलंब आणि नाविन्यपूर्ण कृषी प्रयोगांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला चालना देणे ही काळाची गरज आहे. बदलत्या हवामान परिस्थितीचा आणि दुष्काळाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची साथ हाच शेतकऱ्यांच्या समृद्धीचा नवा मार्ग ठरेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी व्यक्त केला.

२१ व्या राज्यस्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन तसेच जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील आधुनिक कृषी तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), नाविन्यपूर्ण शेती पद्धती आणि विविध कृषी प्रयोगांची माहिती व मार्गदर्शन मिळणार आहे. शेतीचे प्रभावी नियोजन, उत्पादनवाढ, पाण्याचा काटकसरीने वापर आणि शाश्वत शेती यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबींची माहिती शेतकऱ्यांना या प्रदर्शनातून मिळेल. आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये अधिकाधिक वापर वाढवून शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी असे उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरतील.

यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मा. ना. श्री. मकरंद जाधव पाटील, खासदार श्री. नितीन (काका) पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ. वैशाली नागवडे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर, कराड शहराचे नगराध्यक्ष श्री. राजेंद्रसिंह यादव, बाजार समितीचे सभापती पै. सतीश इंगवले, उपसभापती श्री. नितीन ढापरे, संचालक मंडळ, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.