कऱ्हा नदी बारमाही वाहणार..! कऱ्हामाईची ओटी भरणार - सुनेत्रा पवार

कऱ्हा नदी बारमाही वाहणार..! कऱ्हामाईची ओटी भरणार - सुनेत्रा पवार


बारामती: बारामती शहर हे कऱ्हा नदीकिनारी वसले आहे. या आपल्या कऱ्हा नदीला बारमाही वाहती ठेवण्याचे स्वप्न उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पाहिले. अनेकांना अशक्य वाटणाऱ्या या गोष्टीला शक्य करण्याचा दादांचा प्रयत्न पूर्णत्वाकडे जात आहे. त्या प्रयत्नातील महत्वपूर्ण पाऊल आज पडले. 

शहराचे सांडपाणी प्रक्रिया करून स्वच्छ करून नदीत सोडल्या जाणाऱ्या तीन एसटीपी प्रकल्पांचे आज भूमिपूजन केले. पाटस रोड नजीक, मोतीबाग नाला नजीक आणि लेंडी पट्टी नजीक साकारणाऱ्या पाच कोटी पाच लाख रुपयांच्या या प्रकल्पाद्वारे कऱ्हामाईची ओटी बारमाही पाण्याने भरली जाणार आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी दादांनी घेतलेले परिश्रम, दाखवलेली दूरदृष्टी आणि प्रचंड इच्छाशक्ती याबाबत सचिन सातव, इम्तियाजभाई शिकीलगार, प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार जयंत किकले यांनी विस्ताराने सांगितले.

बारामतीच्या विकासाच्या ध्यासाने अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या दादांच्या माध्यमातून साकारणाऱ्या या प्रकल्पामुळे बारामती आणखी सुजलाम सुफलाम होणार आहे हे नक्की.