मुंबई: ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे काल निधन झाले. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. नाटक, सिनेमा आणि मालिकांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांना कॅन्सर झाला होता. मात्र यातून ते बरे झाल्याचेही वृत्त समोर आले होते.