
बारामती बाजार समितीत सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू
बारामती :- बारामती कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये १५ ऑक्टोबर २०२४ रोजी बारामती मुख्य आवारात यांत्रिक चाळणी येथे हमीभाव सोयाबीन खरेदी केंद्राचा शुभारंभ सभापती श्री. सुनिल पवार यांचे हस्ते करण्यात आला आहे.केंद्र शासनाचेकिमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेड मार्फत हंगाम २०२४-२५ मध्ये मुग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी नाव नोंदणी सुरू असुन १५ ऑक्टोबर पासुन सोयाबीन खरेदी सुरू करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील मूग,उडीद, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली नाही अशा शेतकऱ्यांनी मुदतीत नाव नोंदणी करावी असे आवाहन बारामती बाजार समिती तर्फे करण्यात येत आहे.
ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे अशा शेतकऱ्यांना SMS द्वारे शेतमाल घेऊन येणेची तारीख कळविणेत येते. त्याच दिवशी शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर आपला माल आणावा. पहिल्या दिवशी ६ शेतकऱ्यांचे ४० क्विंटल सोयाबीन खरेदी करणेत आले. वाळलेला व स्वच्छ असलेला शेतमाल खरेदी करणेत येणार असल्याची माहिती सचिव श्री.अरविंद जगताप यांनी दिली. यावेळी मार्केटींग फेडरेशन पुणेचे जिल्हा पणन अधिकारी श्री. पवारसाहेब, बाबालाल काकडे निरा कॅनॉल संघाचे चेअरमन सतिश भैय्या काकडे, सदस्य राहुल जगताप तसेच अधिकारी अमोल कदम, प्रशांत मदने आणि बाजार समितीचे सदस्य दत्तात्रय तावरे,विभागप्रमुख सुर्यकांत मोरे उपस्थितीत होते.या शासनाचे हमीभाव केंद्रावर शेतमाल देऊन शेतकऱ्यांनी हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन या प्रसंगी केले.