
"चप्पल काढून मंडपात या" ; पापाराझींवर काजोल भडकली
शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०२४
Edit
बॉलिवूडमधील मुखर्जी कुटूंबात पार पडणारा दुर्गा पूजा उत्सव यंदाही थाटात
पार पडतोय. मुखर्जी कुटूंबातील प्रत्येक सदस्याने या पूजेला हजेरी लावली.
कायमच बबली आणि मस्तीखोर अंदाजासाठी प्रसिद्ध असणाऱ्या काजोलचं मात्र
यावेळी रौद्ररूप पाहायला मिळालं. पापाराझींवर ती चांगलीच भडकली होती.
मुखर्जी कुटूंबातील दुर्गा पूजेला अनेक सेलिब्रिटीज हजेरी लावतात.
बॉलिवूडमधील अनेक कलाकार मंडळी देवीच्या मंडपात हजेरी लावतात. इतकंच नाही
तर देवीचा उत्सवही थाटात साजरा केला जातो. हे सगळं कव्हर करण्यासाठी
आलेल्या पापाराझींच्या वागण्यावरून काजोल भडकली.