
हरयाणानंतर महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजपाचा खास प्लॅन, या ३० जागांवर देणार विशेष लक्ष
शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०२४
Edit
हरयाणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं उभं केलेलं मोठं आव्हान मोडून काढत विजय मिळवल्यानंतर आता भाजपानं
महाराष्ट्रावर आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे. हरयाणामध्ये विजय निश्चित
मानणाऱ्या काँग्रेसला निकालांमधून जबर धक्का बसला होता. तसेच हरयाणातील
यशानंतर आता भाजपानं
महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केलं आहे. तसेच महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत
भाजपानं खास रणनीती आखली आहे. तसेच या रणनीतीवर केंद्रीय गृहमंत्री अमित
शाह हे स्वत: लक्ष ठेवून आहेत. या रणनीतीअंतर्गत पुणे, मुंबई आणि विदर्भावर
खास लक्ष देण्यात येत आहे. पुणे, मुंबई आणि विदर्भातील ३० हून अधिक
जागांवर महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये तीव्र मतभेद आहेत. या ठिकाणी महायुतीकडून
उमेदवारांची घोषणा सर्वात आधी करण्यात येणार आहे. येथे अधिक बलाढ्य
उमेदवार उतरवण्याची आमित शाह यांची योजना आहे. त्यात मुंबईमधील ६,
पुण्यातील ३ आणि विदर्भातील ५ जागांची समावेश आहे.