
महायुतीचे हात बळकट करा - अजित पवार
इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांचा उमेदवारी अर्ज श्री.पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी दाखल करण्यात आला. यावेळी झालेल्या सभेत ते बोलत होते.
पवार पुढे म्हणाले की,महारा ष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचे सरकार राज्यांमध्ये सत्तेत आणायचे आहे.महायुती च्या विचाराचे सरकार केंद्रामध्ये आहे.आगामी काळात महाराष्ट्रा मध्ये केंद्र सरकारच्या मदतीने अनेक योजना राबवायच्या आहेत.
शेतकऱ्यांना मोफत वीज, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सर्व घटकातील महिलांना मदत,शेतकऱ्यांना दुधाचे बाजार भाव वाढवले.अशी अनेक कामे या सरकारने करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे.लाडकी बहीण योजना ही सर्वसामान्य महिलांच्या गरजांसाठी आण लेली आहे.विरोधक या योजनेवर टीका करीत आहेत.त्यांना धडा शिकवा असेही ते म्हणाले.
आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले,इंदापूर तालुक्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांचा विचार करून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत असतांना सर्वांसाठी विविध विकास कामे केली,रस्त्याचे जाळे पसरवले. उजनी धरणावरील पुलाचा प्रश्न मार्गी लावला.उजनी जलाशया मध्ये मत्स्यबीज सोडले.सहा हजार कोटी रुपयांचा निधी तालुक्यांमध्ये आणला.तरी विरोधक टीका करतात.विरोधक टीकाच करणार आहेत.त्यांचे आता पित्त उसळणार आहे,मी रस्ते केले म्हणूनच रस्त्याला खड्डे पडले.यांनीतर काहीच केले नाही तर तिथे खड्डा कसा पडणार ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथे औद्योगिक वसाहत उभी करणार आहे.तालुक्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या पुढील काळातही अनेक योजना तालुक्यामध्ये आणू.शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवला जाईल. लाकडी-निंबोडी योजना चांगल्या पद्धतीने कार्यरत केली जाईल. असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
आमदार अमोल मिटकरी,पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष वासुदेव काळे,प्रदीप गारटकर,संजय सोन वणे,बाळासाहेब सरवदे,हनुमंत कोकाटे आदींची भाषणे यावेळी झाली.
या वेळी प्रतापराव पाटील, डी.एन.जगताप,योगेश जगताप, वैशाली नागवडे,अभिजित रणवरे,श्रीमंत ढोले आदी उपस्थित होते.
जेवणं घालून अदृश्य काम
मागील ( सन २०२४ मधीलच) लोकसभा निवडणुकीचे दरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी आम्हांला घरी नेले,जेवण घातले.आणि विरोधी उमेदवाराचा अदृश्य प्रचार केला.मॅच फिक्सिंग केली. आम्हांला असलं कधी जमलं नाही.आम्ही असलं कधी केलं नाही.
उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी ही मंडळी जनतेचं काय भलं करणार ? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.
१९९५ पासून इंदापूर तालुक्यात सुत गिरणी काढतो.वाइनरी काढतो,अशी आश्वासने देऊन फसवाफसवी केली असेही ते म्हणाले.