वृत्तपत्र विक्रेत्यांना बारामतीत रोख बोनस वाटप
शनिवार, २६ ऑक्टोबर, २०२४
Edit
बारामती :- येथील बारामती वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने दिवाळी निमित्त वृत्तपत्र विक्रेते यांना रोख स्वरूपात बोनस वाटप करण्यात आले.दरवर्षी दिवाळी सणाचे औचित्य साधून बारामती वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने वृत्तपत्र विक्रेत्यांना मदतीचा हात दिला जात आहे.
वृत्तपत्र विक्रेत्यांना बोनस वाटप करून त्यांचा आनंद व्दिगुणीत करण्यात आला आहे. यावेळी विक्रेते विजय सणस, ज्येष्ठ विक्रेते दत्तात्रय उर्फ नामदेव कुंभार,श्याम राऊत, हेमंत भोसले,सतीश शेंडे,प्रकाश उबाळे, प्रकाश शिंदे,रमेशदुधाळ, सूरज चव्हाण,बापू गायकवाड, सचिन सणस,शिवाजी शिर्के, युवराज घुमटकर,प्रभाकर लांडगे,सुभाष टिळेकर,अनिकेत धालपे,भोलेनाथ धाईंजे, मच्छिंद्र सायकर,दैनिकांचे तसेच साप्ताहिक कऱ्हावार्ता व बारामती लोकवार्ताचे मुख्य वितरक राजेंद्र हगवणे,प्रदीप घाडगे,सुनील वाघमारे,पांडुरंग हगवणे,फैय्याज शेख,संतराम घुमटकर,आप्पा घुमटकर, अल्ताफ नवाब,पोपट म्हेत्रे, सुभाष टिळेकर,शिवाजी जाधव व रमेश शिंदे उपस्थित होते.