२ डिसेंबर रोजी शपथविधी; पाच वर्षांसाठी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री
शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०२४
Edit
मुंबई:- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत काल दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. त्याचवेळी सुमारे दोन तास चाललेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सुरुवातीला शिंदे उपमुख्यमंत्रीपदासाठी तयार नव्हते, पण नंतर त्यांची भूमिका मवाळ झाली.
मुंबईत ५ डिसेंबरला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, अशी सुत्रांनी माहिती दिली आहे. ५ डिसेंबरला आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. महायुतीच्या नेत्यांनी एकमुखाने हा निर्णय घेतला असल्याचे समोर आले आहे. याची लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे.
एकनाथ शिंदे यांना गृहखाते स्वत:कडेच ठेवायचे असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.