
राज्य सरकारच्या वतीने प्रथमच राष्ट्रपुरुष श्रीमंत मल्हारराव होळकर यांचे जन्मगावी दिमाखात होणार जयंती महोत्सव सोहळा
बारामती:- राष्ट्रपुरुष श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांचा ३३२ वा जयंती महोत्सव रविवार दि. १६ मार्च २०२५ रोजी सकाळी १०:३० वा.जन्मगाव मुरूम येथे [ता. फलटण जि.सातारा] होणार आहे हा कार्यक्रम सातारा जिल्हा परिषद,फलटण पंचायत समिती व मुरूम ग्रामपंचायत महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहामध्ये व थाटामाटात होणार आहे.
हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे सभापती मा. प्रा राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे पालकमंत्री शंभूराज देसाई, युवक व क्रीडामंत्री दत्तामामा भरणे,बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले,ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे,मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर, मा.खासदार रणजीत निंबाळ कर,आमदार गोपीचंद पडळ कर,फलटण विधानसभेचे आमदार सचिन पाटील कांबळे उपस्थितीत होणार आहे.श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर हे अटकेपार झेंडे फडकवणारे व होळकरशाहीचे मुख्य आधार स्तंभ राहिले असून इतर प्रमुख महापुरुषाएवढेच त्यांचं राष्ट्र निर्माणासाठी महान कार्य राहिले असून याची महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन यावर्षीपासून मोठ्या प्रमाणात जयंती करण्याचे सरकारने ठरवले आहे. लवकरच जन्मगावी राष्ट्रपुरुष मल्हारराव होळकरांच्या पराक्रमाला साजेशी मल्हारसृष्टी निर्माण करण्याचे कार्यसुद्धा सरकारने हातात घेतले आहे.
या कार्यक्रमासाठी खासदार उदयनराजे भोसले,खासदार धर्यशील मोहितेपाटील,महादेव जानकर,आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख,आमदार उत्तमराव जानकर,आमदार नारायण पाटील,होळकर घराण्याचे वंशज भूषणराजे होळकर,ॲड.रामहरी रुपनवर,संजूबाबाराजे निंबाळकर, अमरजीत बारगळ, दीपक चव्हाण,जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषद मुख्याधिकारी याशिनी नागराजन,पोलीस अधीक्षक समीर शेख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमच्या वेळी ध्वजारोहण, गावातून पालखी सोहळा, प्रतिमा पूजन,रक्तदान शिबिर,मान्यवरांचे सत्कार, प्रमुखांचे मार्गदर्शन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने मल्हारप्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन व माहिती राष्ट्रपुरुष श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळ कर जयंती महोत्सव समितीचे प्रमुख शंकरराव माडकर,माणिक राव सोनवलकर,ॲड.गोविंद देव काते,मुरूम गावचे सरपंच योगेश संकपाळ यांनी दिली.