बारामतीत कापड व्यापाऱ्यावर कामावर नसलेल्या कामगाराकडून हल्ला

बारामतीत कापड व्यापाऱ्यावर कामावर नसलेल्या कामगाराकडून हल्ला

 


बारामती :- शहरातील  सम्यक लाइफ स्टाईल कापड दुकानाचे मालक आनंद किशोरकुमार छाजेड यांच्यावर शनिवारी दि.८ मार्चला यापूर्वीच कामावरून काढलेल्या एका कामगाराने प्राणघातक हल्ला केला.या हल्ल्यामध्ये आनंद छाजेड यांच्या दोन्ही डोळ्यांमध्ये खोलवर जखम झाली असून, नाकाचे हाड फॅक्चर झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. 

    दुकानातील एका कामगाराला छाजेड यांनी काम व्यवस्थित करत नसल्याने काही वर्षांपूर्वी कामावरून काढून टाकले होते. त्याने गेल्या दोन वर्षांत त्यांच्या दुकानात जाऊन तोडफोड करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता.बारामती शहर पोलिसांनी त्या वेळेस त्याला अटक करून कारवाईही केली होती. 

     शनिवारी हातात दगड घेऊन संबंधित कामगार दुकानात घुसला.त्याने काचा फोडल्या. दुकानात उपस्थित असलेल्या आनंद छाजेड यांच्या अंगावर दगड घेत तो धावून गेला.त्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनीही या घटनेची दखल घेत तातडीने पोलिसांना कडक कारवाईच्या सूचना केल्या आहेत.बारामती शहर पोलिसांनी संबंधित हल्लेखोरास ताब्यात घेतले आहे.