
मोरगावच्या मयुरेश्वर विद्यालयात महिला दिन उत्साहात
सोमवार, १० मार्च, २०२५
Edit
बारामती:- तालुक्यातील मोरगावचे श्री मयुरेश्वर विद्यालय येथे शनिवार ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ शिक्षिका आम्रपाली गडवे यांनी भूषविले. सर्वप्रथम इयत्ता नववी ब आणि क च्या विद्यार्थ्यांनी विद्यालयाती ल सर्व महिलांचा तसेच व्यासपीठावरील मान्यवरांचा सन्मान केला.याप्रसंगी शर्वरी चांदगुडे व इतर विद्यार्थिनींनी आपली मनोगते व्यक्त केली.सौ. कविता बेलसरे यांनी या प्रसंगी महिलांना वर्षाचे ३६५ दिवस आदराची वागणूक मिळणे गरजेचे आहे असे सांगितले.स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना पुरुषांनाही तेवढाच आदर मिळाला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्राचार्य धनंजय खराटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्त्रियांना समाजात सर्वत्र सदासर्वकाळ सन्मान मिळाला पाहिजे, स्त्रीने स्वतःला कमी न समजता खंबीर व सक्षम बनविले पाहिजे असा संदेश दिला.
अध्यक्षा आम्रपाली गडवे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या प्रसंगी पर्यवेक्षक महादेव आगम, ज्येष्ठ शिक्षक राजाराम गोळे, रामदास बांदल,पूनम माने, कु. दुर्गा वाघमारे,नजमा पठाण,विद्या खैरे माया भोसले यांसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अंकिता गायकवाड व कु.वैष्णवी कदम यांनी केले,तर कु.दुर्गा नलावडे हिने आभार मानले.