बारामतीमध्ये आज गणेश शिंदे यांचे व्याख्यान

बारामतीमध्ये आज गणेश शिंदे यांचे व्याख्यान

 

बारामती: येथील एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने शनिवारी (ता. 26) सुप्रसिध्द व्याख्याते गणेश शिंदे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिबिंब माध्यमातून व्याख्यानमालेच्या नामवंतांचे विचार बारामतीकरांना ऐकता यावेत असा फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचा प्रयत्न असतो.

विद्यानगरीतील गदिमा सभागृहात संध्याकाळी साडेसहा वाजता जीवन सुंदर आहे या विषयावर गणेश शिंदे बारामतीकरांशी संवाद साधणार आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये मानसिक ताणतणावामुळे जीवन संपवून घेण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. क्षुल्लक गोष्टींसाठीही लोक आत्महत्येचे विचार डोक्यात आणतात. जीवन सुंदर असून ते कशा पध्दतीने व्यतित केले पाहिजे, या बाबतचे मार्गदर्शन गणेश शिंदे करणार आहेत. हे व्याख्यान बारामतीकरांसाठी विनामूल्य खुले आहे.